Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. यावर सतत विविध रील्स, गाणी, कॉमेडी व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. असे व्हिडीओ काही क्षण का होईना अनेकांचे मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे, ज्यात एक लहान मुलगी असं काहीतरी करतेय जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

प्रत्येक व्यक्तीला कोणताना कोणतातरी छंद असतोच. कोणाला गाणं गायला आवडतं तर कोणाला चित्र काढायला आवडतं. डान्सदेखील अनेकांच्या आवडीचा छंद आहे, त्यामुळे डान्सवेडे लोक कधी आणि कोणत्या ठिकाणी डान्स करतील हे सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकली चक्क चालू बाईकवर डान्स करताना दिसतेय. तिचा हा डान्स पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
a young guy proposed a girl but she rejected him and ran away
भररस्त्यात प्रपोज करताच मुलगी पळाली अन् तरुण ढसा ढसा रडला, शेवटी लोकांनी दिला धीर; पाहा VIDEO
Little Boy injured While Playing On Swing shocking video
VIDEO: झोक्याचा वेग वाढत गेला अन् चिमुकला थेट…एक चूक अशी जीवावर बेतली; पालकांनो मुलांना गार्डनमध्ये एकटं सोडू नका
Aishwarya and Avinash Narkar Dance Video
Video : पूजा सावंतच्या ‘नाच गो बया’ गाण्यावर ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “झकास…”
In Zoo Boy dropped his shoe animal picked up the shoe with its trunk and gently returned it to the boy 25 year old elephant Win hearts
VIDEO: प्राणीसंग्रहालयात पडला चिमुकल्याचा शूज; हत्तीने सोंडेने उचलून दिला अन्… कर्मचाऱ्यांनी हत्तीला दिलं ‘हे’ बक्षीस
Marathi actress pooja sawant dance on her song Nach Go Baya video viral
Video: नाच गो बया…,पूजा सावंतचा नऊवारी साडीत जबरदस्त डान्स, एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष
a girl child student sleeping in class watch funny video goes viral will make you remember your school days or childhood
भर वर्गात चिमुकलीची झोप सुटेना! डुलकी घेता घेता शेवटी… पाहा मजेशीर VIDEO

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान मुलगी तिच्या बाबांबरोबर बाईकवरून प्रवास करत असून ती मागे बसल्या बसल्या अचानक काही डान्स स्टेप्स करायला सुरुवात करते. सुरुवातीला ती तिचे हात वर करत नंतर दोन्ही हाताने विविध स्टेप्स करायला सुरुवात करते, यावेळी ती तिचा एक पाय मागेदेखील करते. चालू बाईकवर करत असलेल्या स्टेप्स पाहून यावेळी मागून व्हिडीओ काढणारी मंडळी मोठ्याने ओरडून हसतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @siddu989_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत अठरा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच यावर एक मिलियनहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. शिवाय या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘नाच गो बया’ गाण्यावर महाराष्ट्रीयन लूकमध्ये परदेशी इन्फ्लूएंजरचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आमची मराठी संस्कृती…”

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लीक करा:

दरम्यान, यापूर्वी देखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक वयस्कर महिला चक्क एका विमानात डान्स करताना दिसली होती. तर आणखी एका व्हिडीओत एक तरुणी ट्रेनमध्ये डान्स करताना दिसली होती. हे व्हिडीओदेखील खूप चर्चेत आले होते.