Viral Video : सध्या पावसाळा सुरू आहे. अनेक लोक निसर्गाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी घराबाहेर पडत आहे. तलाव, धबधबे, झरे, इत्यादी पाण्याच्या ठिकाणी वर्षाविहार करण्यासाठी जाताना दिसत आहे. पण अशा ठिकाणी भेट देताना सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते पण अनेक जण सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत असून स्वत:हून जीव धोक्यात टाकतात. (People Enjoying Sea Waves at Digha Beach by putting their lives in danger video goes viral on social media)

काही दिवसांपूर्वी भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याशिवाय ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे एका तरुणाने मजेत धबधब्यात उडी मारली आणि तो वाहून गेला. अशा घटना ताज्या असताना सुद्धा लोक ऐकत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका समुद्रकिनारी लोक समुद्राच्या मोठ्या लाटांचा आनंद घेत आहे पण त्यांची एखादी चूक त्यांना महागात पडू शकते.

In Zoo Boy dropped his shoe animal picked up the shoe with its trunk and gently returned it to the boy 25 year old elephant Win hearts
VIDEO: प्राणीसंग्रहालयात पडला चिमुकल्याचा शूज; हत्तीने सोंडेने उचलून दिला अन्… कर्मचाऱ्यांनी हत्तीला दिलं ‘हे’ बक्षीस
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
Shocking video Water Increased in waterfall Many People Drowing In Water Scary Video
अवघ्या ५ सेकंदात मृत्यूनं गाठलं; संपूर्ण कुटुंब वाहून गेलं मात्र, ‘हा’ एक व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून कसा बाहेर आला बघाच
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
The young man went to the forest and took a picture with cheetah
जीवापेक्षा फोटो महत्त्वाचा; जंगलात जाऊन तरुणाने चित्त्याच्या बाजूला बसून काढला फोटो, पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून अंगावर येईल काटा

हेही वाचा : कंगाल पाकिस्तानात मारुतीची अल्टो कार चालविण्याची ही कोणती पद्धत? VIDEO आला समोर, नेटकरी म्हणाले, “अपघात…”

समुद्राच्या लाटा अंगावर घेण्यासाठी जीव धोक्यात टाकताहेत

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की असंख्य लोक समुद्र किनारी लाटांचा आनंद घेत आहे पण या लाटांचा वेग खूप जास्त आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल ती लोक जीव धोक्यात घालून समुद्राच्या पाण्यात उतरले आहे. विशेष म्हणजे या बीचवर भयंकर गर्दी आहे. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक या बीचवर दिसताहेत. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ पश्चिम बंगाल येथील दीघा बीचवरील आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

दीघा बीच हे कोलकाता पासून १८७ किमी अंतरावर मिदनापुर जिल्ह्यात आहे. दरदिवशी हजारो पर्यटक या बीचला भेट देतात. लोकप्रिय वीकेंड टूरिस्ट ठिकाण म्हणून हा बीच ओळखला जातो. पश्चिम बंगालमधील हे सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे जिथे पावसाळ्यात लोकांची प्रचंड गर्दी दिसून येते.

हेही वाचा : ‘नाच गो बया’ गाण्यावर महाराष्ट्रीयन लूकमध्ये परदेशी इन्फ्लूएंजरचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आमची मराठी संस्कृती…

dighaseabeach18 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटवर असे अनेक दीघा बीचवरील व्हिडीओ यापूर्वी शेअर केले आहेत.