Apple iPads Production In India: बलाढ्य कंपन्यांनी भारतात उत्पादन केंद्र निर्माण करावे यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या योजनांचे फळ म्हणून येत्या काही महिन्यांमध्ये Apple कंपनी भारतात iPads ची निर्मिती पुन्हा सुरु करण्याच्या तयारीत असल्याचे समजतेय. याविषयी मनीकंट्रोलने कंपीनीतील सूत्रांच्या (नाव न सांगण्याच्या विनंतीवर) हवाल्याने वृत्त दिले आहे. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, यापूर्वी Apple ने चीनच्या BYD सह भागीदारी करून भारतात आयपॅड्सच्या निर्मितीचा प्रयत्न केला होता मात्र चीन व भारतामधील राजकीय तणावाच्या स्थितीमुळे केंद्र सरकारने यावर निर्बंध लादले होते. हा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे Apple आता भारतातच उत्पादनासाठी पार्टनर शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे.

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मनीकंट्रोलला सांगितले आहे की, “BYD भारतात आयपॅड उत्पादनाचा कारखाना सुरू करण्यासाठी तयार होते परंतु मंजुरीची समस्या होती आणि आता परिस्थिती बदलली आहे. आम्ही आता Apple ला पुढील दोन-तीन वर्षांत भारतात अधिक प्रगती करता येईल या उद्देशाने मदत करत आहोत. त्यामुळे उत्पादनात सुद्धा लक्षणीय वाढ होईल.”

Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
shankaracharya swami avimukteshwaranand saraswati on rahul gandhi hindu statement
Video: “जेव्हा आम्हाला राहुल गांधींच्या हिंदूंबाबतच्या विधानाबद्दल सांगण्यात आलं, तेव्हा…”, शंकराचार्यांचं मोठं विधान!
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
Jay Shah on Rohit Sharma captaincy
टी-२०तून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा; म्हणाले, “यापुढे तो…”
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
Union Budget 2024 Updates in Marathi
Tax Slabs 2024-25 Budget 2024 Updates: अर्थसंकल्पात ऑटो क्षेत्रासाठी तब्बल ३५०० कोटींची तरतूद
anil deshmukh devendra fadnavis
Anil Deshmukh on Devendra Fadnavis: “आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला असा…”, अनिल देशमुखांचं मोठं विधान; देवेंद्र फडणवीसांवरही केले गंभीर आरोप!

Apple ने शेअर केल्या मोठ्या योजना

Apple ने येत्या काही वर्षात भारतात लॅपटॉप आणि डेस्कटॉपचे उत्पादन करावे अशी सरकारची इच्छा आहे. अधिकाऱ्याने सांगितले की Apple ने भारतात पुढील २- ३ वर्षांत राबवता येतील अशा काही ‘मोठ्या योजना’ सरकारसह शेअर केल्या आहेत. त्यांना भारतात एक पर्यायी पुरवठा साखळी तयार करायची आहे. तुपामुळे आणखी भागीदार भारतात येतील आणि विद्यमान भागीदार त्यांच्या क्षमता आणखी वाढवतील. भारतात आयपॅड उत्पादन ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी मंजुरी मिळवण्यात अडचणी आल्याने गेल्या वर्षी, Apple ने आपले iPad उत्पादन BYD सह व्हिएतनाममध्ये सुरु केले होते.

Apple चं लक्ष पुण्याकडे!

भारतात आयफोनची उत्पादन क्षमता वाढवण्यासह, Apple कंपनी सध���या Jabil Inc सह मिळून भारतात एअरपॉडच्या वायरलेस चार्जिंग केसेसच्या भागांचे उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहे. आपल्या माहितीसाठी सांगायचं तर, Jabil Inc ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय करार निर्मिती कंपनी आहे, जी स्वीडनच्या Ericsson साठी 4G आणि 5G उपकरणे बनवते. सध्या भारतात TWS (ट्रू वायरलेस स्टिरिओ), AirPods चे उत्पादन पुढील वर्षाच्या सुरुवातीला पूर्णपणे सुरू करण्याची Apple कंपनीची योजना आहे. यासाठी Apple कंपनीने पुण्यात जबिलसह वायरलेस चार्जिंग केसेसच्या भागांचे (टेस्ट) उत्पादन सुरू केले आहे. येत्या काळात फॉक्सकॉनसह उत्पादन निर्मितीची चाचणी सुद्धा केली जाऊ शकते.

Apple आणि टाटा हा कॉम्बो ठरतोय पॉवरफुल!

आयफोन नंतर आयपॉड्स हे Apple चे जागतिक स्तरावर TWS (ट्रू वायरलेस स्टिरिओ) मार्केटमध्ये आघाडीवर असणारे उत्पादन आहे. Apple ने फॉक्सकॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून भारतात आपल्या फ्लॅगशिप आयफोन उपकरणांचे स्थानिक उत्पादन वाढवले ​​आहे. टाटा कंपनीने यासाठी विस्ट्रॉन ऑपरेशन्स ही कंपनी ताब्यात घेतली होतीच आणि आता जोडीने पेगट्रॉनला सुद्धा टाटा कंपनीत जोडून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. या व्यवहारात चेन्नईजवळील आयफोन उत्पादन प्रकल्प आणि आणखी एक बांधकाम सुरू असलेला प्रकल्प सुद्धा समाविष्ट आहे.

हे ही वाचा<< आदित्य-L1 ची पहिली सूर्यप्रदक्षिणा पूर्ण; कसा होता प्रवास, किती दिवस लागले? जाणून घ्या सविस्तर…

पुढील तीन- चार वर्षांमध्ये भारतातील सर्व आयफोन्सच्या एक चतुर्थांश उत्पादन हे भारतातच होईल हे कंपनीचे लक्ष्य आहे, हे प्रमाण आकडेवारीनुसार पाहायला गेल्यास Apple च्या एकूण आयफोन उत्पादनाच्या १४ टक्के आहे. चिनी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी स्थानिक विक्रेत्यांचे नेटवर्क तयार करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

काउंटरपॉईंट र��सर्चच्या अहवालानुसार, Apple कंपनीने २०२३ मध्ये भारतात १० दशलक्ष आयफोन निर्यात केले होते, कोरियन प्रतिस्पर्धी सॅमसंगला मागे टाकून २०२३ मध्ये Apple ने भारतात विक्रमी विक्रीची नोंद केली होती. २०२२ मध्ये, निर्यातीचे प्रमाण ६ दशलक्ष आयफोन इतके होते.