T20 World Cup 2024 Highlights, India Won Against Pakistan: टी-२० विश्वचषक २०२४ चा १९ वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांमधील हा सामना खूपच नीचांकी धावसंख्येचा आणि रोमांचक होता. ज्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ धावांनी विजय मिळवला. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा ७ वा विजय आहे. तर पाकिस्तान संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत भारताला एकदाच पराभूत करू शकला आहे. भारतीय गोलंदाजांनी करिष्माई कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित सेनेला केवळ ११९ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला ७ बाद ११३ धावाच करता आल्या. या विजयात हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ यांनी मोलाचे योगदान दिले.

Live Updates

T20 World Cup 2024, IND vs PAK Match Highlights  : टी-२० विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट विक्रम राहिला आहे. २००७ पासून या स्पर्धेत दोन्ही संघ आठ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने सात वेळा तर पाकिस्तान संघाने एकदा विजय मिळवला आहे.

01:14 (IST) 10 Jun 2024
IND vs PAK : रोमांचक सामन्यात भारताचा पाकिस्तानवर ६ धावांना विजय

न्यूयॉर्कच्या नासाऊ इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांनी करिष्माई कामगिरी करत टीम इंडियाला 6 धावांनी विजय मिळवून दिला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित सेनेला केवळ 119 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानची धावसंख्या 13व्या षटकात 2 बाद 73 धावांपर्यंत पोहोचली. असे असतानाही भारतीय गोलंदाजांनी सामना फिरवला. 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ केवळ 113 धावा करू शकला. भारताकडून जसप्रीत बुमराहने 3 आणि हार्दिक पांड्याने 2 बळी घेतले.भारताने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 19 षटकांत 119 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत दिसत होता. एकवेळ 14व्या षटकात पाकिस्तानची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 80 धावा होती. यानंतर रिझवान-शादाब बाद झाल्याने सामन्याला कलाटणी मिळाली.

https://twitter.com/KaviBhadana1/status/1799890219770196360

01:00 (IST) 10 Jun 2024
IND vs PAK : पाकिस्तानला विजयासाठी १२ चेंडूत २१ धावांची गरज

18 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या 5 विकेटवर 99 धावा आहे. पाकिस्तानला आता 12 चेंडूत विजयासाठी 21 धावा करायच्या आहेत. भारतीय गोलंदाजांनी चमत्कार केला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, इमाद वसीम आणि इफ्तिखार अहमद क्रीजवर आहेत.

https://twitter.com/realwitcher_/status/1799886720353362053

00:54 (IST) 10 Jun 2024
IND vs PAK : पाकिस्तानला आता १८ चेंडूत ३० धावांची गरज

पाकिस्तानची धावसंख्या 17 षटकांत 5 बाद 90 धावा. पाकिस्तानला आता 18 चेंडूत 30 धावा करायच्या आहेत. भारतीय गोलंदाजांनी चमत्कार केला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सध्या इमाद वसीम आणि इफ्तिखार अहमद क्रीजवर आहेत.

https://twitter.com/_retrosoul_/status/1799885038751977651

00:49 (IST) 10 Jun 2024
IND vs PAK : पाकिस्तान संघाला सर्वात मोठा धक्का! बुमराहने रिझवानला केले क्लीन बोल्ड

17 व्या षटकात 88 धावांवर पाकिस्तानची पाचवी विकेट पडली. भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले आहे. सामना आता भारताच्या ताब्यात आहे. शादाबला बाद करून हार्दिक पंड्याने पाकिस्तानला पाचवा धक्का दिला.

https://twitter.com/JagruthGoud/status/1799883981040800169

00:38 (IST) 10 Jun 2024
IND vs PAK : पाकिस्तान संघाला सर्वात मोठा धक्का! बुमराहने रिझवानला केले क्लीन बोल्ड

पाकिस्तानला 80 धावांवर चौथा धक्का बसला. १५व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने रिझवानला क्लीन बोल्ड केले. तो 44 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. सध्या शादाब खान आणि इमाद वसीम क्रीजवर आहेत.

https://twitter.com/Riyaagrahari8/status/1799881067643769249

00:29 (IST) 10 Jun 2024
IND vs PAK : पाकिस्तानला तिसरा धक्का

पाकिस्तानला तिसरा धक्का

पाकिस्तानला 73 धावांवर तिसरा धक्का बसला. हार्दिक पांड्याने फखर जमानला यष्टिरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. त्याला 13 धावा करता आल्या. बाबर आणि उस्मानही पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. सध्या इमाद वसीम आणि मोहम्मद रिझवान क्रीजवर आहेत.

https://twitter.com/kingbabararmy/status/1799878159858630912

00:19 (IST) 10 Jun 2024
IND vs PAK : पाकिस्तानला दुसरा धक्का

पाकिस्तानला 11व्या षटकात 57 धावांवर दुसरा धक्का बसला. अक्षर पटेलने उस्मान खानला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला 13 धावा करता आल्या. सध्या फखर जमान आणि रिझवान क्रीजवर आहेत. 11 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 66 धावा आहे.

https://twitter.com/Taha75618/status/1799875714038034667

00:10 (IST) 10 Jun 2024
IND vs PAK : आठव्या षटकात पाकिस्तानचे अर्धशतक

मोहम्मद रिझवान आणि उस्मान खान सामना भारताच्या पकडीपासून दूर नेत आहेत. 8 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या एका विकेटवर 51 धावा आहे. रिझवान 31 चेंडूत एका षटकारासह 22 धावांवर खेळत आहे. तर उस्मान खान 13 चेंडूत 12 धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/_FaridKhan/status/1799872727102206361

00:05 (IST) 10 Jun 2024
IND vs PAK : मोहम्मद सिराजच्या षटकात केवळ तीन धावा आल्या

7 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या एका विकेटवर 38 धावा आहे. मोहम्मद सिराजच्या या षटकात केवळ तीन धावा आल्या. रिझवान 24 चेंडूत एका षटकारासह 18 धावांवर खेळत आहे. तसेच उस्मान खान आठ चेंडूत तीन धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/SouravJosh50698/status/1799872742755533075

00:00 (IST) 10 Jun 2024
IND vs PAK : पॉवरप्लेच्या समाप्तीनंतर पाकिस्तानची धावसंख्या १ बाद ३५ धावा

पॉवरप्लेच्या 6 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या एका विकेटवर 35 धावा आहे. हार्दिक पंड्याच्या या षटकात रिझवानने समोरच्या दिशेल खणखणीत षटकार ठोकला. मात्र, षटकात केवळ 9 धावा आल्या. रिझवान 23 चेंडूत 17 धावांवर खेळत आहे. तसेच उस्मान खान एका धावेवर आहे.

https://twitter.com/iamMiraab/status/1799869024551264503

23:53 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : पाकिस्तानला पहिला धक्का, कर्णधार बाबर आझम झेलबाद

26 च्या स्कोअरवर पाकिस्तानला पहिला धक्का. पाचव्या षटकात बुमराहने बाबर आझमला स्लिपमध्ये सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. बाबरला 13 धावा करता आल्या. सध्या उस्मान खान आणि रिझवान क्रीजवर आहेत. शिवम दुबेने रिझवानचा सोपा झेल सोडला होता. त्यानंतर रिझवान सात धावा करून क्रीजवर होता.

https://twitter.com/AyushDw18636185/status/1799868772372845054

23:46 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : तीन षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद

3 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या एकही विकेट न गमावता 19 धावा आहे. बाबर आझम चार चेंडूत एका चौकारासह 9 धावांवर खेळत आहे. तर मोहम्मद रिझवान 14 चेंडूत 8 धावांवर खेळत आहे. पाकिस्तानला आता विजयासाठी 101 धावा करायच्या आहेत.

https://twitter.com/itsganeshhere_/status/1799868150403735564

23:40 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : मोहम्मद रिझवानला मिळाले जीवनदान

2 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या एकही विकेट न गमावता 15 धावा आहे. बाबर आझम तीन चेंडूत एक चौकारासह आठ धावांवर खेळत आहे. तर मोहम्मद रिझवान ९ चेंडूत ५ धावांवर खेळत आहे. त्याला या षटकात एक जीवनदान मिळाले. त्याचा सोपा झेल शिवम दुबेने सोडला. भारतीय गोलंदाज विकेट घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

https://twitter.com/Memesworldforu/status/1799866493238477185

23:33 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : अर्शदीप सिंगच्या पहिल्या षटकात आल्या ९ धावा

भारताकडून अर्शदीप सिंगने पहिले षटक टाकले. या षटकात एकूण 9 धावा आल्या. मोहम्मद रिझवान पाच चेंडूत चार तर बाबर आझम एका चेंडूत तीन धावांवर खेळत आहे. पाकिस्तानसमोर 120 धावांचे लक्ष्य आहे.

23:18 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच 'ऑल आऊट', विजयासाठी दिले १२० धावांचे लक्ष्य

भारतीय संघ 19 षटकांत 119 धावांत गारद झाला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची फलंदाजी खूपच खराब झाली. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर, सर्वकाही अपयशी ठरले. शेवटच्या षटकात शेपटीच्या फलंदाजांच्या काही धावांमुळे भारताला 119 धावांपर्यंत मजल मारता आली. पंरतु भारतीय संघ पहिल्यांदा ऑल आऊट झाला आहे.

https://twitter.com/BCCI/status/1799860729706864876

रोहित शर्मा 13 धावा, विराट कोहली चार धावा, अक्षर पटेल 20 धावा, सूर्यकुमार यादव सात धावा, शिवम दुबे तीन धावा करून बाद झाला. हार्दिक पंड्या सात धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी अर्शदीप सिंग नऊ धावा करून धावबाद झाला. सिराज सात धावा करून नाबाद राहिला. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 42 धावा केल्या. त्याने 31 चेंडूंच्या खेळीत सहा चौकार मारले. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर मोहम्मद आमिरने दोन विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदीला एक विकेट मिळाली.

23:07 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : हरिसने घेतल्या सलग दोन विकेट्स

हरिस रौफने 18 व्या षटकात टीम इंडियाला दोन मोठे धक्के दिले. हरिसने आधी हार्दिक पांड्याला बाद करून जसप्रीत बुमराहला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 18 षटकांनंतर भारताची धावसंख्या 9 गड्यांच्या मोबदल्यात 113 धावा आहे.

https://twitter.com/PakistaniIndex/status/1799856974747607337

22:56 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : भारतीय संघाची धावसंख्या शंभरी पार

16 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या सात विकेटवर 100 धावा आहे. हार्दिक पंड्या आठ चेंडूत एका धावेवर आहे. तर अर्शदीप सिंग सात चेंडूत तीन धावांवर खेळत आहे. भारतीय संघ कसा तरी धावसंख्या 140 च्या जवळ नेऊ इच्छित आहे.

22:53 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : आमिरने एका षटकात दिले दोन मोठे धक्के, पंत-जडेजाला पाठवले तंबूत

भारताने 15 व्या षटकात 96 धावांवर सात विकेट गमावल्या आहेत. या षटकातील सलग दोन चेंडूंवर मोहम्मद आमिरने ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पंतने 31 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. त्याचवेळी जडेजाला खातेही उघडता आले नाही. सध्या हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग क्रीजवर आहेत.

22:48 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : भारताने सात विकेट गमावल्या

भारताने 15 व्या षटकात 96 धावांवर सात विकेट गमावल्या आहेत. या षटकातील सलग दोन चेंडूंवर मोहम्मद आमिरने ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पंतने 31 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. त्याचवेळी जडेजाला खातेही उघडता आले नाही. सध्या हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग क्रीजवर आहेत.

https://twitter.com/accountnofive/status/1799853422373753082

22:39 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : भारताची पाचवी विकेट पडली

14 व्या षटकात नसीम शाहने टीम इंडियाला पाचवा धक्का दिला आहे. एकूण 95 धावांवर भारताने पाचवी विकेट गमावली. नसीम शाहने शिवम दुबेला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. दुबेला 9 चेंडूत केवळ तीन धावा करता आल्या.

22:31 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : हरिसने सूर्यकुमारला दाखव���ा तंबूचा रस्ता

12व्या षटकात हरिस रौफने टीम इंडियाला चौथा धक्का दिला. हरिसने सूर्यकुमार यादवला झेलबाद केले. भारतीय संघाने 89 धावांवर चौथा विकेट गमावला आहे. मात्र, ऋषभ पंत दुसऱ्या टोकाकडून शानदार फलंदाजी करत आहे.

22:24 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : ऋषभने रौफच्या षटकात लगावली चौकारांची हॅट्ट्रिक

10व्या षटकात ऋषभ पंतने हरिस रौफवर सलग तीन चौकार मारले. या षटकात एकूण 13 धावा आल्या. 10 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 3 विकेटवर 81 धावा आहे. ऋषभ पंतने 23 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 34 धावा केल्या आहेत. तर सूर्यकुमार यादव चार चेंडूत एक चौकारासह पाच धावांवर खेळत आहे.

22:19 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : ९ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या ३ बाद ६८ धावा

9 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 3 विकेटवर 68 धावा आहे. ऋषभ पंत 18 चेंडूत 21 धावांवर खेळत आहे. त्याने दोन चौकार मारले आहेत. सूर्यकुमार यादव तीन चेंडूत पाच धावांवर आहे.

https://twitter.com/ankit_bhattar/status/1799844957953597847

22:12 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : भारताला तिसरा धक्का

आठव्या षटकात 58 धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. नसीम शाहने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड केले. तो 18 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 20 धावा करून बाद झाला. टी-20 विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय फलंदाजाच्या या सर्वाधिक धावा आहेत. अक्षर आणि पंत यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी झाली. सध्या ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर आहेत. आठ षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा आहे.

https://twitter.com/ErRashidKashmir/status/1799843858190360626

22:04 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : अक्षर-ऋषभने सावरला भारतीय संघाचा डाव, पॉवरप्लेनंतर धावसंख्या २ बाद ५० धावा

सहाव्या षटकात 12 धावा आल्या. मात्र, यात ऋषभ पंतलाही दोन जीवदान मिळाले. शेवटच्या दोन षटकात एकूण 26 धावा झाल्या. 6 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 2 विकेटवर 50 धावा आहे. अक्षर पटेल 12 चेंडूत 15 धावांवर खेळत आहे. ऋषभ पंत 9 चेंडूत 15 धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/BCCI/status/1799841880718598145

21:54 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : अक्षर-ऋषभने सावरला भारतीय संघाचा डाव, ५ षटकानंतर भारताची धावसंख्या २ बाद ३८ धावा

4 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 2 विकेटवर 38 धावा आहे. ऋषभ पंत तीन चेंडूत तीन तर अक्षर पटेल सहा चेंडूत एका धावेवर खेळत आहे. मोहम्मद आमिरने चौथ्या षटकात केवळ चार धावा दिल्या. अशा प्रकारे अक्षर आणि ऋषभने भारतीय संघाचा डाव सावरला आहे. अक्षर पटेल 10 चेंडूत 14 धावांवर खेळत आहे. ऋषभ पंत पाच चेंडूत चार धावांवर खेळत आहे.

21:42 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : शाहीनने रोहितला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

शाहीन आफ्रिदीने तिसऱ्या षटकात टीम इंडियाला दुसरा धक्का दिला. षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा चौकारावर झेलबाद झाला. तो 12 चेंडूत 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आला.

https://twitter.com/SATISHMISH78/status/1799836951840993569

21:39 (IST) 9 Jun 2024
नसीम शाहने दुसऱ्या षटकात आठ धावा देत घेतली विराटची विकेट

नसीम शाहने दुसऱ्या षटकात आठ धावा देत विराट कोहलीची विकेट घेतली. 2 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या एका विकेटवर 19 धावा आहे. रोहित शर्मा आठ चेंडूत 13 धावांवर खेळत आहे. तर ऋषभ पंतने अद्याप खाते उघडलेले नाही.

21:34 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली ४ धावांवर झेलबाद

भारताला पहिला झटका 12 च्या स्कोअरवर बसला. सामना पुन्हा सुरू होताच नसीम शाहने दुसऱ्याच चेंडूवर विराट कोहलीला उस्मान खानकरवी झेलबाद केले. त्याला चार धावा करता आल्या. सध्या ऋषभ पंत आणि रोहित शर्मा क्रीजवर आहेत.

https://twitter.com/KevinKarani_/status/1799835143043183019

21:23 (IST) 9 Jun 2024
IND vs PAK : पाऊस थांबला, सामना साडेनऊला सुरु होणार

न्यूयॉर्कमध्ये पाऊस पूर्णपणे थांबला आहे. आता सामना पुन्हा 9.30 वाजता सुरू होईल. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे षटके कापली गेली नाहीत. म्हणजे अजूनही पूर्ण 20-20 षटकांचा सामना असेल.

https://twitter.com/incricketteam/status/1799832145277616534

IND vs PAK Live Match Score Updates in Marathi T20 World Cup 2024

India Won by 6 Runs against Pakistan Highlights : न्यूयॉर्कच्या नासाऊ इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांनी करिष्माई कामगिरी करत टीम इंडियाला ६ धावांनी विजय मिळवून दिला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित सेनेला केवळ ११९ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला ७ बाद ११३ धावाच करता आल्या