सुहास पाटील

● ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा, महाराष्ट्र, ( Unit of Munitions India Ltd.) (संरक्षण मंत्रालयांतर्गत भारत सरकारचा उपक्रम). ( Advt. No. GA/ Hire/ AOCP/152/02/2024) ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट ( AOCP) अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग करून NCVT परीक्षा उत्तीर्ण केली आहे, अशा उमेदवारांची ‘डेंजर बिल्डींग वर्कर ( DBW)’ पदांवर ठराविक मुदतीसाठी करारपद्धतीने भरती.

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
19 kg LPG cylinder rates slashed by Rs 30 form today
LPG Gas Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; आता किती रुपयांना मिळणार सिलिंडर? असे आहेत नवे दर!
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
Kuldeep Yadav Marriage
कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…
Natasa Shares Cryptic Video As Hardik Pandya Returns
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”

एकूण रिक्त पदे – ( Table A) ५८ (अजा८, अज ७, इमाव १५, ईडब्ल्यूएस ८, खुला २०) (माजी सैनिकांसाठी ८ पदे राखीव) (दिव्यांग उमेदवार या पदांसाठी पात्र नाहीत.)

पात्रता – ऑर्डनन्स फॅक्टरी आताची म्युनिशन्स इंडिया लिमिटेड ( MIL) मधून अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट ( AOCP) अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग पूर्ण करून NCVT किंवा ठअउ परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा NCVT ने जारी केलेले AOCP ट्रेडमधील NAC/ NTC सर्टिफिकेट. ( Table B) – १०० (अजा १०, अज ९, इमाव २७, ईडब्ल्यूएस १०, खुला ४४) (माजी सैनिकांसाठी १० पदे राखीव).

पात्रता – ऑर्डनन्स फॅक्टरी आताची म्युनिशन्स इंडिया लिमिटेड ( MIL) मधून अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट ( AOCP) अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग पूर्ण करून NCVT किंवा NAC परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

वेतन – मूळ वेतन रु. १९,९००/- डी.ए. रु. ९,९५०/- (उमेदवारांची कामगिरी पाहून दरवर्षी ३ टक्के वेतन वाढ दिली जाईल.)

हेही वाचा >>> UPSC ची तयारी : भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये

वयोमर्यादा – दि. १५ जुलै २०२४ रोजी १८ ते ३५ वर्षे. (कमाल वयोमर्यादा इमाव ३८ वर्षे, अजा/अज ४० वर्षे, माजी सैनिक सेना दलातील सेवा ३ वर्षे)

अर्जाचे शुल्क – 

कामाचे स्वरूप – मिलिटरी एक्स्प्लोझिव्हज आणि अॅम्युनिशनचे उत्पादन आणि हाताळणी.

निवड पद्धती – NCVT आणि ट्रेड टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्टमधील गुणवत्तेनुसार. ठउश्ळ मधील गुणवत्तेनुसार उमेदवारांना ट्रेड टेस्टसाठी बोलाविले जाईल. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापासून एक महिन्याच्या आ�� ऑर्डनन्स फॅक्टरी, खामरिया येथे १०० गुणांसाठी ट्रेड टेस्ट घेतली जाईल.

अंतिम निवड NCVT मधील गुण आणि ट्रेड टेस्ट / प्रॅक्टिकल टेस्टमधील एकत्रित गुणवत्तेनुसार केली जाईल. NCVT परीक्षेतील गुणांना ८० टक्के वेटेज व ट्रेड टेस्टमधील गुणांना २० टक्के वेटेज दिले जाईल. यानंतर शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल.

इमावच्या उमेदवारांनी इमावच्या दाखल्यासोबत Appendix-1 मधील घोषणापत्र भरावयाचे आहे.

रजा – उमेदवारांना दर महिन्याला २.५ दिवस रजा क्रेडिट केली जाते आणि अशी एकूण ३० दिवस रजा मिळू शकते आणि ती १ पूर्ण झाल्यानंतर विकू शकतात. (Encashed)

DBW उमेदवारांना हॉस्टेल अकोमोडेशन न दिल्यास HRA दिला जाईल. उमेदवारांची नेमणूक सुरूवातीला १ वर्षासाठी केली जाईल.

कराराचा कालावधी आणखीन ३ वर्षांसाठी वाढविला जाऊ शकतो. नेमणुकीनंतर उमेदवारांची दर सहा महिन्यांनी कामगिरी तपासली जाईल. https://munitionsindia.in/career/ या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये दिलेल्या विहीत नमुन्यातील अर्जाची प्रिंटआऊट घेऊन पूर्ण भरलेला अर्ज ज्यावर पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून (समोरील बाजूस स्वयं साक्षांकीत करून) आणि स्वयं साक्षांकीत केलेल्या आवश्यक त्या कागदपत्रांसह पुढील पत्त्यावर दि. १५ जुलै २०२४ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

The Chief General Manager, Ordnance Factory, Bhandara, Dist. Bhandara, Maharashtra – 441 906. अर्जाच्या लिफाफ्यावर ‘ APPLICATION FOR THE POST OF DBW PERSONNEL OF AOCP TRADE ON TENURE BASIS AGAINST TABLE A/ TABLE B VACANCIES’ असे ब्लॉक लेटरमध्ये स्पष्ट लिहावे.चंद्रपूर फॅक्टरीमधील संधी

● ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा, चंद्रपूर ( Unit of Munitions India Ltd.) (संरक्षण मंत्रालयांतर्गत भारत सरकारचा उपक्रम) ( No. 7545/ HRDC/ GA/ TA/2024-25 dtd. 07.06.2024) अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स, जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट्स, डिप्लोमा होल्डर्ससाठी सन २०२४-२५ मध्ये १ वर्ष कालावधीच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगकरिता प्रवेश. डिसिप्लिननुसार रिक्त पदांचा तपशील.

(१) ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस (ग्रॅज्युएट इंजिनीअर्स) ४५ पदे (अजा ७, अज ३, इमाव १२, खुला २३) (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/सिव्हील प्रत्येकी १५ पदे). स्टायपेंड दरमहा रु. ९,०००/-.

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण.

(२) ग्रॅज्यएट अॅप्रेंटिस (जनरल स्ट्रीम) ४५ पदे (अजा ७, अज ३, इमाव १२, खुला २३) ( B. Sc. २५ पदे, B. Com. १० पदे, B. C. A. १० पदे). स्टायपेंड दरमहा रु. ९,०००/-.

पात्रता – B.Sc./ B.Com/ B.C.A. पदवी उत्तीर्ण.

(३) टेक्निशियन अॅप्रेंटिस (डिप्लोमा होल्डर्स) ५० पदे (अजा ८, अज ४, इमाव १३, खुला २५) (मेकॅनिकल ३० पदे,

इलेक्ट्रिकल १० पदे, सिव्हील १० पदे). स्टायपेंड दरमहा रु. ८,०००/-.

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.

संबंधित पदवी/डिप्लोमा गेल्या ५ वर्षांच्या आत उत्तीर्ण केलेला असावा. संबंधित पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवाराकडे किमान १ वर्ष किंवा अधिक कामाचा अनुभव असावा.

अर्जाचा विहीत नमुना https://munitionsindia.in/career/ या वेबसाईटवरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज खालील पत्त्यावर दि. २० जुलै २०२४ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. To, The Chief General Manager, Ordnance Factory, Chanda, Chandrapur ( Maharashtra) – 442 501.