10th July Panchang & Rashi Bhavishya: १० जुलै २०२४ ला आज आषाढ महिन्यातील पंचमी तिथी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी सुरु होत आहे. आज मघा नक्षत्र जागृत असणार आहे व व्यतिपाता योग आहे. आजच्या दिवशी अभिजात मुहूर्त नसला तरी राहुकाळाचे दोन तास वगळता उर्वरित दिवस शुभ आहे. दुपारी १२ वाजून २६ मिनिटांपासून ते २ वाजून ८ मिनिटांपर्यंत राहूकाळ असणार आहे. आजच्या दिवशी चंद्र सिंह राशीत उपस्थित असेल.

१० जुलै पंचांग व राशी भविष्य

मेष:-घरगुती प्रश्न मिटतील. साधनेला चांगला काळ आहे. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करावे. स्वत:वर ताबा ठेवावा. दिवस खेळीमेळीत जाईल.

12th July Marathi Panchang & Rashi Bhavishya
१२ जुलै पंचांग: कुंभ राशीस अचानक धनलाभ, मीनला शांतता, अन्य १० राशींना शुक्रवारी वैभवलक्ष्मी कशी देईल वरदान?
6th July Ashadh Prarambh Panchang & Rashi Bhavishya
६ जुलै पंचांग: आषाढ महिन्याच्या सुरुवातीला शनीचं वरदान; आज अचानक धनलाभासह १२ राशींना काय फायदा होईल पाहा
11th July Panchang & Rashi Bhavishya
११ जुलै पंचांग: कुणाला कौटुंबिक सौख्य तर कुणाला खर्चाचा फटका; मेष ते मीन राशींना आजचा गुरुवार कसा जाईल, वाचा
18th July Panchang & Rashi Bhavishya
१८ जुलै पंचांग: ब्रह्म योग अन् अभिजात मुहूर्तामुळे आज कुणाला होणार धनलाभ? १२ राशींच्या नशिबात आज लिहिलंय वाचा
1st July 2024 Panchang And Rashi Bhavishya Mesh To Meen Which zodiac signs will be blessed by Lord Shiva Read Daily Marathi horoscope
१ जुलै पंचांग: व्यवसायात भरघोस वाढ ते कौटुंबिक सौख्य; १२ पैकी या राशींवर राहील शंकराची कृपा; वाचा ‘सोमवार’चे तुमचे राशिभविष्य
17th July Ashadhi Ekadashi Rashi Bhavishya
आषाढी एकादशी, १७ जुलै पंचांग: आज विठोबा कोणत्या राशींना पावणार? देव निद्रेस जाण्याआधी बदलतील ‘या’ मंडळींचे दिवस
24th July Panchang & Rashi Bhavishya
संकष्टी चतुर्थी २४ जुलै पंचांग: मेषला अच्छे दिन तर धनूला लाभणार नवी ओळख; १२ राशींना बाप्पा आज कसा देतील प्रसाद?
13th July Panchang & Rashi Bhavishya
१३ जुलै पंचांग: मीनला भागीदारीतून धनलाभ, मेषच्या जोडीदाराचं वर्चस्व; शनिवारी शिव योग जुळल्याने १२ राशींना काय मिळणार?

वृषभ:-कामे जलद गतीने उरकण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावा. चांगल्या गुंतवणुकीतून लाभाचे योग. व्यापारी वर्गाला दिवस लाभदायक असेल. खादी चांगली बातमी मिळेल.

मिथुन:-तरुण मंडळींनी फार उतावीळपणा करू नये. बदल स्वीकारावा लागेल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. वाहन विषयक अडचण मिटेल. हातात काही अधिकार येतील.

कर्क:-पारदर्शी व्यवहार करावेत. भावंडांना सहाय्य करावे लागेल. आज एखादी आठवण जागृत होईल. विरोधक नामोहरम होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

सिंह:-अतिविचार करू नका. नवे मनसुबे यश देतील. बोलण्यातून आत्मविश्वास प्रकट कराल. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मित्रांची उत्तम साथ लाभेल.

कन्या:-कलाकार मंडळींना वेगळा दर्जा मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. झोपेची तक्रार जाणवेल. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. घराबाहेर सावधानतेने वावरावे.

तूळ:-महिला वर्ग खुश राहील. मनातील प्रबळ इच्छा पूर्ण होईल. टीमवर्क उपयोगाला येईल. नवीन विचार जाणून घेता येतील. शुभ वार्ता मिळतील.

वृश्चिक:-कामात अधिक उत्साह वाटेल. कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल. दिवसाची सुरुवात व्यस्त राहील. लाभाच्या अनेक संधी चालून येतील. मनातील चिंता दूर होईल.

धनू:-खाण्या-पिण्याचे पथ्ये पाळावीत. निर्णय उत्स्फूर्तपणे घेतले तर फळाला येतील. ज्येष्ठांशी सुसंवाद साधावा. सहकार्‍यांशी वाद घालू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

मकर:-जुने व्यवहार लाभ देतील. काळाची पाऊले ओळखावीत. घरगुती वादविवादात अडकू नका. कामातील प्राधान्य जाणून घ्यावे. धार्मिक कामात मन रमवाल.

कुंभ:-जोडीदाराची प्रगती होईल. चर्चेतून नवकल्पना सुचतील. करमणूक प्रधान गोष्टी कराल. भेटवस्तू देताना खर्चाचा विचार कराल. सहकार्‍यांना सोबत कराल.

हे ही वाचा<< लक्ष्मी नारायण योग पुढील २३ दिवस ‘या’ ५ राशींना देईल प्रचंड धन-दौलत; नशिबात राजासारखं जीवन जगण्याची संधी

मीन:-उत्साहाने कार्यरत राहाल. दिवसाची सुरुवात धीम्यागतीने होईल. समस्यांचे निराकरण होईल. कौटुंबिक वादात पडू नका. स्वभावात उधळेपणा येईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर