Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे या राजकीय नेत्या असून त्या राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) या पक्षाच्या खासदार आहेत. सुप्रिया सुळे या माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांचा जन्म ३ जून १९६९ रोजी पुणे येथे झाला. त्यांनी मुंबईतील जय हिंद महाविद्यालयातून सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. ४ मार्च १९९१ रोजी सदानंद सुळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.


सुप्रिया सुळे यांनी २००६ साली राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २००६ मध्ये त्या पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेल्या. तसेच २००९ मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. २०१२ मध्ये सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना करण्यात आली. या संघटनेमार्फेत त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी काम करण्यास सुरुवात केली. या संघटनेची स्थापना झाल्यानंतरच्या काही महिन्यात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात स्त्रीभ्रूण गर्भपात, हुंडापद्धती आणि सर्वसाधारणपणे महिला सक्षमीकरणावर भर देणारे अनेक मोर्चे काढण्यात आले. सुप्रिया सुळे या २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग चार वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडणून आल्या आहेत.


सुप्रिया सुळे यांना त्यांच्या संसदीय कार्यासाठी ओळखले जाते. त्यांना संसदरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले आहेत. सामाजिक सेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना ऑल लेडीज लीगतर्फे मुंबई महिला ऑफ द डिकेड अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


Read More
Supriya Sules criticized governmentover the Union budget 2024
Supriya Sule: “महाराष्ट्रावर अन्याय का?”; अर्थसंकल्पावरुन सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते संतापले आहेत. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्याही घोषणा…

Amit Shah: अमित शाह यांची शरद पवारांवर टीका; सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर
Amit Shah: अमित शाह यांची शरद पवारांवर टीका; सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर

पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. “भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद…

supriya sule
अमित शाह यांची शरद पवारांवर टीका; सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “याच शरद पवारांना मोदी सरकारने…”

अमित शाह यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Ajit Pawar, Supriya Sule,
अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या ‘त्या’ सूचनेचे केले कौतुक

पुणे जिल्हा नियोजन समितीची उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

Sharad Pawar on Ajit Pawar
अजित पवार परत आले तर पक्षात घेणार का? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “घरात सर्वांना जागा, पण…”

महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींवर आज शरद पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य केलं.

Sharad pawar on Ajit pawar Baramati Lok Sabha result
Sharad Pawar on Ajit Pawar : ‘अजित पवारांनी विकास कामं केली तरी लोकांनी सुनेत्रा पवारांना का नाकारलं?’, शरद पवार म्हणाले, “शेवटी ती बारामती…”

Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवारांनी बारामतीत विकास केल्याचे सांगितले. केंद्रात सत्ता असलेल्यांचा खासदार असला तर विकासनिधी मिळेल,…

RSS Vivek Weekly Ajit pawar NCP
RSS on Ajit Pawar : ‘भाजपालाच आता अजित पवार नकोसे’, संघाच्या विवेक साप्ताहिकातील लेखावर शरद पवार गटाची मोठी प्रतिक्रिया…

RSS Magzine on Ajit Pawar : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित असलेल्या साप्ताहिक विवेकने अजित पवारांशी केलेल्या युतीवरून नाराजी व्यक्त केली…

Supriya Sule
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाजपा खरं बोलणार असेल तर मी सहा प्रश्न विचारते, त्याची उत्तरं द्या”

शरद पवार यांचा सल्ला विरोधकांनाही घ्यावासा वाटतो यातच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

sharad pawar, sunetra pawar
सुनेत्रा पवारांनी घेतली शरद पवार अन् सुप्रिया सुळेंची भेट

पुण्यातील शिवाजीनगर भागातील मोदी बागेतील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी सकाळच्या सुमारास सुनेत्रा पवार यांनी या दोघांची जवळपास…

mamata banerjee and sharad pawar
9 Photos
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट! पाहा फोटो

ममता बॅनर्जी या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी काल (१२ जुलै) उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट घेतली.

Supriya Sule Visit Ajit Pawar House in baramati
सुप्रिया सुळे अजित पवारांच्या निवासस्थानी, बाहेर आल्यानंतर कारणही सांगितलं; म्हणाल्या, “मी आज..”

अजित पवारांच्या मातोश्रींची मी भेट घेतली आणि तिथून निघाले असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या