Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

शरद पवार

sharad pawar

शरद पवार हे भारतातील प्रमुख राजकारण्यांपैकी एक आहेत. शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुण्यातील बारामती तालुक्यात झाला. ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारण करणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. काँग्रेसपासून वेगळे होऊन त्यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना केली. मात्र २०२३ साली झालेल्या पक्षातील फुटीनंतर आता त्यांच्या पक्षाचे नाव “राष्ट्रवादी कांग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष”, असे आहे. तर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याकडे आहे.


शरद पवारांनी १९६० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीमधून विधानसभेवर निवडून आले आणि १९७८ मध्ये महाराष्ट्राचे सर्वात कमी वयातील मुख्यमंत्री झाले. त्यांनी तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. १९८४ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. केंद्रातही त्यांनी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळून त्यावर आपली छाप सोडली. राजकारणाबरोबरच शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.


आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, अंडरवर्ल्ड संबंध याशिवाय अनेक वाद झाले. तरीही चाणाक्ष पुढाऱ्याप्रमाणे त्यांनी विविध पक्षांसह युती करुन आपले राजकीय अस्तित्व आजही अबाधित ठेवले आहे. २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांना एकत्र आणत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. शरद पवारांच्या या खेळीमुळे १०६ आमदार असलेल्या भाजपाला अडीच वर्ष सत्तेपासून दूर राहावे लागले.


२०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेतला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधिमंडळात अजित पवार हा दावा टिकवण्यात यशस्वी झाले. पक्ष फुटीनंतरही शरद पवार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज देत १० उमेदवारांपैकी ८ उमेदवार जिंकून आणण्यात यश मिळवले. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाला एकच खासदार निवडून आणता आला. या निवडणुकीत शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका झाली. ते नेतृत्व सोडत नसल्याचा आरोप अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या नेत्यांनी केला. तरीही हे हल्ले पचवून शरद पवारांनी आपल्या पक्षाला यश मिळवून दिले.


Read More
What Shyam Manav Said?
Shyam Manav : “महाराष्ट्रात शेठजी-भटजींचं सरकार; शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी…”, श्याम मानव यांचं वक्तव्य

सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी महाविकास आघाडीला त्यांचा पाठिंबा जाहीर केला आहे.

ajit pawar meets amit shah in delhi ahead of assembly polls in maharashtra
शहांच्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता?अजित पवारांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ग्रामविकास गिरीश महाजन यांच्यासह दोन मंत्र्यांनी अधिक निधी मागितला.

Sharad pawar shyam manav
Shyam Manav : “श्याम मानव लवकरच तुतारी गटात जाणार”, राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा; म्हणाले, “विधानसभेला…”

Shyam Manav Devendra Fadnavis : श्याम मानव तुतारी गटात जातील, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.

What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “मला टार्गेट केल्याने कुणाचा फायदा होतो हे..”, फडणवीसांचा शरद पवारांकडे अंगुलीनिर्देश?

देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे. तसंच मला टार्गेट केल्याने कुणाला फायदा होतो हे सगळ्यांना माहीत…

Manikrao Kokate on MahaYuti Government
महायुतीत धुसफूस! “मंत्र्यांनी अजूनही सुधरावं…”, अजित पवार गटाच्या आमदाराचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर आरोप केले आहेत.

What Laxman Hake Said About Manoj Jarange?
Laxman Hake: “शरद पवार आणि मनोज जरांगेंची सेम लाईन, माझ्याकडून लिहून घ्या ते..”, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत निवडणुकीला सामोरं जाऊ असं म्हटलं आहे, त्यांच्या या निर्णयावर लक्ष्मण हाकेंनी टीका केली.

son of deputy speaker of legislative assembly attend sharad pawar group gathering
नरहरी झिरवाळ यांचा मुलगा शरद पवार गटाच्या व्यासपीठावर – वडिलांनाही परतण्याची साद

विधानसभा उपसभापतींचा मुलगा मेळाव्यात सहभागी झाल्याच्या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना चिमटे काढले

Sharad Pawar group leader Jayant Patil replied to Amit Shahs criticism
Jayant Patil: “शरद पवारांना भ्रष्टाचारी म्हणणं हा विनोद आहे”; जयंत पाटील

“भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत”,अशी टीका अमित शाह यांनी केली. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची…

ncp chief sharad pawar meets cm eknath shinde to discuss obc maratha reservation issues
आरक्षणावर मुख्यमंत्री शरद पवार चर्चा; साखर कारखाने, दुधाच्या प्रश्नात लक्ष घालण्याची शिंदेंना विनंती

मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असून मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

vilas lande letter, vilas lande, Sharad Pawar,
पिंपरी-चिंचवड: शरद पवारांवरील टीकेनंतर अजित पवारांच्या माजी आमदाराचे भाजपा श्रेष्ठीला पत्र

भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर महायुतीच्या सोबत असलेल्या अजित पवार गटाच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त…

Laxman Hake On Manoj Jarange
Laxman Hake On Manoj Jarange : “मनोज जरांगेंसाठी लाडका आंदोलक योजना आणा”, लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला

लक्ष्मण हाके यांनी आज जनआक्रोश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

Jitendra Awhad, amit shah, corruption,
…मग समजेल भ्रष्टाचारांचा सरदार कोण, आमदार जितेंद्र आव्हाड यांची शहांवर टीका

शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावे. आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत. मग, समजेल भ्रष्टाचाराचा…

संबंधित बातम्या