Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पुढारी आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत.


शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि जाहिर सभांमधून राज ठाकरेंनी आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली. शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना होताच, परप्रांतियांचे राज्यात येणारे लोंढे, भूमिपुत्रांचे हक्क, मराठी भाषेला प्राधान्य, रेल्वेमध्ये होणारी उत्तर भारतीयांची नोकरभरती, मुंबईच्या समुद्रकिनारी होणारी छठपुजा या मुद्द्यांवरून जोरदार रणशिंग फुंकले.

मनसेने टोल विरोधात छेडलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. तसेच मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले. राज ठाकरेंच्या आक्रमक आणि स्थानिक मुद्द्यांच्या राजकारणामुळे २००९ साली विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला गळती लागत २०१४ आणि २०१९ साली राज ठाकरेंना केवळ एक आमदार निवडून आणता आला.


राज ठाकरेंनी वेळोवळी घेतलेल्या राजकीय भूमिका अनेकदा वादात अडकल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मनसेचे उमेदवार उभे केले, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार केला. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीचा घटक होणे पसंत केले. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.


Read More
kedar dighe on dharmveer 2 movie
13 Photos
धर्मवीर भाग दोनच्या ट्रेलरवरून राजकारण तापलं, आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंनी घेतला आक्षेप, एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले…

केदार दिघे म्हणाले, काही महिन्यांपासून तुमचे नेते दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ आम्ही बाहेर काढू, असं सांगत आहेत, याचा अर्थ….

Raj Thackeray
ठरलं! मनसेही विधानसभा निवडणूक लढवणार, ‘इतक्या’ जागांवर उभे करणार उमेदवार; राज ठाकरेंच्या शिलेदाराने सांगितली रणनीती

MNS VidhanSabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेही उमेदवार उभे करणार आहे.

sharad pawar raj thackeray
Sharad Pawar : “राज ठाकरे महिन्याभराने जागे झाल्यावर…”, शरद पवारांचा पलटवार; म्हणाले, “जनता ज्याची दखल…

Sharad Pawar on Caste based politics in Maharashtra : राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणासाठी शरद पवारांना अनेकदा जबाबदार ठरवलं…

Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंची सध्याच्या सामाजिक स्थितीवर टीका, आषाढी एकदशीनिमित्त पोस्ट करत म्हणाले…

Raj Thackeray on AShadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

Raj Thackeray subhash dandekar camlin
Subhash Dandekar Death : जगभर डंका वाजवणाऱ्या मराठी उद्योजकाला राज ठाकरेंकडून श्रद्धांजली, Camlin च्या ‘उंटा’ची गोष्ट सांगत म्हणाले…

Subhash Dandekar Camlin Founder Death : जगभर डंका वाजवणाऱ्या या मराठी उद्योजकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख…

Raj Thackeray Raju Patil
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा एक आमदार सर्वांचं गणित बिघडवणार? राजू पाटील कोणाला मत देणार?

राजू पाटील म्हणाले, राज ठाकरे हे सध्या अमेरिकेत असून विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही.

Raj thackeray anil patil
“बरं झालं, आमदारांना रुळावरून चालत जावं लागलं”, मनसेची सरकारवर बोचरी टीका; म्हणाले, “महाराष्ट्राला…”

मुंबईत रविवारी आणि सोमवारी मुसळधार पावसामुळे शहरातील रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. तेव्हा एक्सप्रेसही खोळंबल्या होत्या.

Pramod Patil On Vasant More
“वसंत मोरेंना मनसे सोडल्याचा पश्चात्ताप होईल”, राजू पाटलांचा टोला; म्हणाले, “आता फेसबुक लाईव्हचं नेतृत्व…”

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी वसंत मोरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Vasant More Joins Shivsena UBT
राज ठाकरेंचा शिलेदार आता उद्धव ठाकरेंसोबत; वसंत मोरेंचा तीन महिन्यांत प्रकाश आंबेडकरांना ‘जय महाराष्ट्र’!

वसंत मोरे हे राज ठाकरेंची साथ सोडून वंचितसह गेल्याने चर्चेत राहिले होते आता अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी वंचितलाही राम राम…

Sharad Pawar and Raj Thackeray
“आमचे पाय जमिनीवरच”, शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आणि महाराष्ट्रातील गेल्या दोन वर्षातील राजकीय घडामोडींबाबत राज ठाकरे यांनी सूचक भाष्य केलं होतं.

Raj Thackeray
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याची बातमी केव्हा मिळणार?” अमेरिकेत विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर; म्हणाले, “मॅटर्निटी होम…”

राज ठाकरेंची ही मुलाखत चांगली तासभर चालली. तासभराच्या या मुलाखतीत राज ठाकरे यांना विविध विषयांवर बोलतं केलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार…

संबंधित बातम्या