Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये हा पक्ष फुटला. जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार ( Ajit Pawar)यांनी बंडखोरी करत मूळ राष्ट्रवादी पक्ष सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट आणि अजित पवार गट या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. अजित पवार भाजपा प्रणित महायुतीतील सरकारमध्ये सहभागी झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केले. अजित पवार गटात प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, सुनील तटकरे या नेत्यांचा समावेश आहे.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत अजित पवार यांना महाराष्ट्रात केवळ चारच जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी केवळ एकाच जागेवर अजित पवार गटाला विजय मिळाला. या उलट शरद पवार गटाला महाविकास आघाडीत १० जागा मिळाल्या होत्या. त्यांना ९ जागा जिंकण्यात यश आले. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट कमजोर झाल्याचे समजले जात होते. मात्र निवडणुकीत विजयश्री खेचत शरद पवार यांनी पक्षाला पुन्हा उभारी मिळून दिली.


पक्षाची स्थापना ( Formation of NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआमध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) घड्याळ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. २०२३ मध्ये राष्ट्रवादी हा पक्ष फुटून त्याचे दोन गट झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना बहाल केले असून आता अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत.


Read More
Due to the pothole on the road the traffic jam is being caused and to attract the attention of the municipal administrationthe NCP Sharad Pawar group is holding a banner
बदलापूर पालिकेचा लाडका खड्डा पाहिला का? राष्ट्रवादीची पालिकेच्या विरूद्ध बॅनरबाजी

बदलापूर शहराच्या एकमेव उड्डाणपुलावर आणि पुलाच्या प्रवेशद्वारावर सालाबादाप्रमाणे यंदाही खड्डे पडले आहेत.

BJP leaders request to RSS
‘अजित पवार यांच्यावर टीका करणे टाळा’, भाजपानं संघाला विनंती केल्याची चर्चा; राजकीय तर्कवितर्कांना उधाण!

BJP leaders request to RSS : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर आणि विवेक या साप्ताहिकांमधून अजित पवारांशी…

Maharashtra Cabinet Meeting
Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा मोठे निर्णय; आशा स्वयंसेविकांना १० लाखांचा अपघाती विमा मिळणार

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तक यांच्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : गुलाबी राजकारणामागे दडलंय काय? बॅनरपासून जॅकेटपर्यंत एकच रंग का? महिलेच्या प्रश्नावर अजित पवारांचं खास उत्तर

Ajit Pawar Pink Jacket : अजित पवार सातत्याने गुलाबी जॅकेट परिधान करून फिरत आहेत.

MLA Hiraman Khoskar On Congress
Hiraman Khoskar : “उमेदवारी मिळाली नाही तर…”, आमदार हिरामण खोसकरांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी आपल्याच पक्षाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

Ajit Pawar Post on his Birth Day
Ajit Pawar :अजित पवार यांचं गुलाबी जॅकेट, सुनेत्रा पवारांनी दिलेला पांढरा गुलाब आणि खास पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे, यात त्यांनी केलेली पोस्टही चर्चेत आहे.

Ajit Pawar, NCP, BJP, local body elections, municipal elections, district council elections,mahayuti , Maharashtra politics, political strategy, vidhan Sabha elections, party growth, Shiv Sena, Congress, Maha vikas Aghadi,
अजित पवारांची स्वबळाची घोषणा का ?

अजित पवार यांनी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने राष्ट्रवादी महायुतीत समाधानी नाही…

sharad pawar nifad nashik
दिंडोरीच्या यशानंतर शरद पवारांची निफाडमध्ये मोर्चेबांधणी, आमदार दिलीप बनकर यांच्या अडचणीत वाढ

दिंडोरी लोकसभा निवडणुकीत भाजपचे पानिपत केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे बंडखोरी करणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात मोर्चेबांधणीला लागले…

Atul Benke Sharad Pawar Ajit Pawar Amol Kolhe Nationalist Congress Party
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनकेंचं मोठं विधान

अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके आता शरद पवार गटामध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Anger about allies in BJP meeting  Complaints of Shiv Sena  NCP not working in Lok Sabha Mumbai
भाजपच्या बैठकीत मित्रपक्षांविषयी नाराजी; शिवसेना, राष्ट्रवादीने लोकसभेत काम न केल्याच्या तक्रारी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षांतील काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी काम केले नाही किंवा…

NCP, sharad pawar, ajit pawar, pimpri chinchwad
पिंपरी : वर्चस्वासाठी दोन्ही ‘राष्ट्रवादीं’ची चढाओढ

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शनिवारी (२० जुलै) विजयी संकल्प मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन करणार आहे तर अजित पवार रविवारी (२१ जुलै)…

संबंधित बातम्या