Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
congress appoints sunil kanugolu as strategist in maharashtra
कानुगोलू यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी; कर्नाटक, तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार

सुनील कानुगोलू यांना सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड मागणी आहे. कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळण्यात कानुगोलू यांची भूमिका महत्त्वाची…

rahul gandhi
“किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीसाठी मोदी सरकारवर दबाव आणू”, राहुल गांधींचं शेतकऱ्यांना आश्वासन!

राहुल गांधी यांनी आज दिल्लीत किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली १२ शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.

Praniti Shinde raised the issue in Lok Sabha over Maratha reservation
Praniti Shinde: “महाराष्ट्रात मराठा, धनगरांना आरक्षण द्या”; प्रणिती शिंदेंनी लोकसभेत मांडला मुद्दा

आज लोकसभेमध्ये काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मराठा आणि धनगरांच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला आहे. यावेळी त्या म्हणाल्या,”आरक्षणाच्या मु्द्यावरुन महाराष्ट्रात तणाव…

Karnataka, Telangana, Congress, victory,
कर्नाटक, तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार, सुनील कानुगोलू यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी

कर्नाटक आणि तेलंगणातील काँग्रेसच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजाविणारे प्रसिद्ध रणनीतीकार सुनील कानुगोलू यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी काँग्रेसने सोपविली आहे.

youth congress president, nitin raut, son, kunal raut, assembly election 2024, chandrapur constituency
चंद्रपूर: प्रदेश युवक कॉग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत ‘येथून’ लढण्यास इच्छुक

लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदार संघात कॉग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी घेतल्याने कॉग्रेसकडे इच्छुकांची गर्दी वाढली…

MLA Hiraman Khoskar On Congress
Hiraman Khoskar : “उमेदवारी मिळाली नाही तर…”, आमदार हिरामण खोसकरांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी आपल्याच पक्षाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

Alibag, Alibag assemble seat, shetkari kamgar paksh, Shekap, Jayant Patil, Congress Claims Alibag Assembly Seat Congress, Assembly Seat, Maha vikas Aghadi, Election Defeat, maharasthra asselmbly election 2024, Seat Claim
विधानसभा निवडणुकीतही शेकापची कोंडी करण्याची काँग्रेसची खेळी

नुकत्याच विधान परिषद निवडणूकीत काँग्रेसच्या असहकार्यामुळे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणूकीत काँग्रेसकडून शेकापला असहकार्याची…

Lok Sabha Election 2024 Seat Allocation BJP Congress Mahavikas Aghadi
महाराष्ट्रातील जागावाटपात भाजप, काँग्रेस थोरले भाऊ? मित्र पक्षांची कितपत तयारी!

भाजप असो वा काँग्रेस आपल्या आघाडीत थोरल्या भावाच्या भूमिकेत जाण्यासाठी आटापिटा करत असले तरी, जागावाटपात मित्रपक्ष त्यांना कितपत जुमानतील याची…

Congress has also prepared a list of spokespersons to face the BJP
भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसकडूनही प्रवक्त्यांची फौज

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्धी माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्यासाठी तसेच विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याकरिता प्रवक्त्यांची भलीमोठी यादी तयार केली असताना…

Congress MLA arrested in Haryana ED action in illegal mining case
हरियाणात काँग्रेस आमदार अटकेत, बेकायदा खाणप्रकरणी ईडीची कारवाई ; २९ जुलैपर्यंत कोठडी

बेकायदा खाणींतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हरियाणातील काँग्रेस आमदार सुरेंदर पंवार यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.

UPSC chief resigns Congress alleges that the ouster was due to controversies
‘यूपीएससी’च्या प्रमुखांचा राजीनामा; वादांमुळे हकालपट्टी झाल्याचा काँग्रेसचा आरोप

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली.

upsc president resign congress criticized
यूपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “संविधानिक संस्थांना…”

यूपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या