Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
uddhav thackeray ajit pawar girish mahajan
Budget 2024: “अजित पवार गिरीश महाजनांना म्हणाले, पैसा जमा करायला जमिनी विकू का?” ठाकरे गटाचा दावा; मतभेदांवर ठेवलं बोट!

“निर्मलाताई ‘बजेट’ पेश करीत असताना महाराष्ट्रात देवेंद्रभौ फडणवीस हे हाती कागद-पेन्सिल घेऊन टिपणे काढीत होते!”

कोकण प्रांतावर महायुतीची भिस्त; भाजपच्या बैठकीत ३९ जागांचा आढावा

संपूर्ण बैठकीत ठाणे विधानसभा मतदारसंघावर शिंदेसेनेचे नेते दावा सांगत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे आल्या.

cm shinde ordered education department to organize a meeting after bjp mla letter to implement educational policy
निवडणुकीचे वर्ष आहे; शालेय गुणवत्तेत सुधारणा दाखवा! भाजप आमदाराची मागणी, मुख्यमंत्र्यांचे आदेश अन् अधिकाऱ्यांची पळापळ

या बैठकीत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, मराठवाड्यातील दोन जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक आणि पुण्यातील एका जिल्हापरिषदेच्या शाळेतील शिक्षक यांना तज्ज्ञ…

Abdul Sattar
छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागताच अब्दुल सत्तारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “शेवटची ओव्हर…”

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची वर्णी लागली आहे.

Vijay Wadettiwar On Narendra Modi Ajit Pawar
“बेटा अजित कितना खाया? सरदार ७० हजार कोटी”; विजय वडेट्टीवारांची पंतप्रधान मोदी आणि अजित पवारांवर टीका

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Prasad Lad On Manoj Jarange Patil
“तुम्ही २८८ उमेदवार उभे करा, मग आम्हीही पाहून घेतो…”, प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना इशारा

काही दिवसांपूर्वी सुरु केलेलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी आज स्थगित केलं.

Vijay Wadettiwar On Ashok Chavan
“अशोक चव्हाण आता पिंजऱ्यातील पोपट झालेत”, विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपाचे नेते, खासदार अशोक चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली.

BJPs ex-MP leave party Big blow to BJP in East Vidarbha
भाजपच्या माजी खासदाराने ठोकला पक्षाला रामराम ; पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का

पक्षात कर्मठ कार्यकर्त्यांना किंमत नसून धनदांडग्यांची पक्षात हुजरेगिरी चालत असल्याचा घणाघाती आरोप करीत भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी पक्षाचा…

Manikrao Kokate on MahaYuti Government
महायुतीत धुसफूस! “मंत्र्यांनी अजूनही सुधरावं…”, अजित पवार गटाच्या आमदाराचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर आरोप केले आहेत.

Review of 39 constituencies of Konkan in BJP meeting
कोकणपट्टीवरच महायुतीची भिस्त, भाजपच्या बैठकीत ३९ जागांचा आढावा

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या पाच जिल्ह्यांतील विधानसभेच्या ३९ जागा या आगामी निवडणुकीत महायुतीच्या बाजूने निर्णायक ठरु शकतील,…

संबंधित बातम्या