Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

अजित पवार

 


अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. ते जुलै २०२३ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. अजित पवार हे एका राजकीय कुटुंबाचे सदस्य आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (Business Administration) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९० मध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९९१ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ते अनेकदा निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.पवार त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यामधील वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय त्यांना जाते. पण जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्रातील प्रमुख राजकिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भष्ट्राचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.


Read More
ajit pawar meets amit shah in delhi ahead of assembly polls in maharashtra
शहांच्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता?अजित पवारांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ग्रामविकास गिरीश महाजन यांच्यासह दोन मंत्र्यांनी अधिक निधी मागितला.

Abdul Sattar
छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागताच अब्दुल सत्तारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “शेवटची ओव्हर…”

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची वर्णी लागली आहे.

Vijay Wadettiwar On Narendra Modi Ajit Pawar
“बेटा अजित कितना खाया? सरदार ७० हजार कोटी”; विजय वडेट्टीवारांची पंतप्रधान मोदी आणि अजित पवारांवर टीका

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Sharad pawar shyam manav
Shyam Manav : “श्याम मानव लवकरच तुतारी गटात जाणार”, राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा; म्हणाले, “विधानसभेला…”

Shyam Manav Devendra Fadnavis : श्याम मानव तुतारी गटात जातील, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.

Girish Mahajan Ajit Pawar
Girish Mahajan : कॅबिनेट बैठकीत अजित पवार-गिरीश महाजनांमध्ये निधीवरून खडाजंगी? महाजन म्हणाले, “मी माझ्या खात्यासाठी…

Girish Mahajan vs Ajit Pawar : निधी वाटपावरून गिरीश महाजन व अजित पवारांमध्ये वाद झाल्याचं वृत्त काही वृत्तपाहिन्यांनी प्रसारित केलं…

Vijay Wadettiwar On Ashok Chavan
“अशोक चव्हाण आता पिंजऱ्यातील पोपट झालेत”, विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपाचे नेते, खासदार अशोक चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली.

Eight ex Corporators of Nationalist Sharad Chandra Pawar Party in Kalwa Mumbaira join Ajit Pawar Group
कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाड यांना धक्का; आठ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश

कळवा-मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला…

nashik ajit pawar mla manik kokate marathi news
महायुतीतील खदखद चव्हाट्यावर, अजित पवार गटाच्या आमदाराची मंत्र्यांवर टीका

भविष्यकाळ वाईट असून अद्याप वेळ गेलेली नाही, मंत्र्यांनी सुधारणा करावी, आमदारांच्या फाईल मार्गी लावाव्यात, असे कोकाटे यांनी सूचित केले.

vijay wadettiwar on ajit pawar girish mahajan clash
अजित पवार-गिरीश महाजन यांच्यातील खडाजंगीची चर्चा, विजय वडेट्टीवारांची खोचक टीका; म्हणाले, “उद्या एकमेकांचे…”

विजय वडेट्टीवर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना अजित…

Manikrao Kokate on MahaYuti Government
महायुतीत धुसफूस! “मंत्र्यांनी अजूनही सुधरावं…”, अजित पवार गटाच्या आमदाराचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर आरोप केले आहेत.

BJP leaders request to RSS
‘अजित पवार यांच्यावर टीका करणे टाळा’, भाजपानं संघाला विनंती केल्याची चर्चा; राजकीय तर्कवितर्कांना उधाण!

BJP leaders request to RSS : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर आणि विवेक या साप्ताहिकांमधून अजित पवारांशी…

anil deshmukh devendra fadnavis
Anil Deshmukh on Devendra Fadnavis: “आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला असा…”, अनिल देशमुखांचं मोठं विधान; देवेंद्र फडणवीसांवरही केले गंभीर आरोप! प्रीमियम स्टोरी

Anil Deshmukh: “मी पुराव्यांशिवाय बोलत नाही”, असं म्हणत अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.

संबंधित बातम्या