Yahoo मेसेंजर

हे मॉड्यूल 3 डिसेंबर 2015 रोजी किंवा त्यानंतर रिलीज केलेल्या Yahoo मेसेंजर संस्करणाविषयीच्या आमच्या गोपनीयता पद्धतीबद्दल माहिती देते. Yahoo आपली वैयक्तिक माहिती कशी हात���ळते, ह्या विषयी अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या गोपनीयता धोरण ला भेट द्या.

नोट: Yahoo मेसेंजरचे संस्करण जे 3 डिसेंबर 2015 पुर्वी रिलीज केले आहे ते आता समर्थित असणार नाही,, तथापि आपण गोपनीयता मॉड्यूलचे पुनरावलोकन येथे करू शकता. कृपया नवीन Yahoo मेसेंजर वर अपग्रेड करा.

माहिती संकलन आणि वापर पद्धती

  • आपण जेव्हा Yahoo मेसेंजर वापरता, तेव्हा आम्ही आपल्या विषयी माहिती गोळा करतो. आम्ही थेट आपल्याकडून माहिती गोळा करतो, जसे की आपला फोन क्रमांक, ईमेल पत्ता, छायाचित्र आणि आपल्या परवानगीने आपल्या उपकरणावरील संपर्क. आपण Yahoo मेसेंजर वापरता तेव्हा आम्ही ���पल्याकडून स्वयंचलितपणे सुद्धा माहिती गोळा करतो, जसे की आपला IP पत्ता, ठिकाण, उपकरण वापराचे विश्लेषण, उपकरण ID आणि प्रकार तसेच मोबाइल वाहक.
  • आम्ही ह्या गोळा केलेल्या माहितीचा वापर आपल्याला आमची उत्पादने आणि सेवा पुरवण्यासाठी, आपल्याशी संवाद साधण्यासाठी, आणि आमची उत्पादने ऑपरेट व सुधाण्यासाठी करतो. उदाहणार्थ, आम्ही ही माहिती आपल्यासाठी खाते बनवण्यासाठी आणि आपल्यासाठी शोध सक्रीय करण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी, आणि इतर Yahoo मेसेंजर उपभोगत्यांशी संवाद साधण्यासाठी (आणि त्या उलट) वापरतो.
  • Yahoo मेसेंजरचा वापरतांना आपली संवाद सामग्री आमच्या सर्व्हरवर संग्रहीत केली जाते आणि आमच्या प्लेटफॉर्मच्या माध्यमातून ती आपल्यासाठी शोधण्यास योग्य अशी बनवली जाते.
  • आपण संभाषण आणि/किंवा न पाठवलेली संवाद सामग्री साफ करू शकता, तथापि आम्ही ऑडिट आणि रेकॉर्ड ठेवण्याच्या उद्देशाने तात्पुरत्या स्वरूपात त्याच्या प्रती आणि लॉग राखून ठेवतो.
    • कृपया लक्षात ठेवा: आपण ज्या उपयोगकर्त्यासोबत संवाद साधला होता तो उपयोगकर्ता जरी आपण त्यास आपले संभाषण आणि छायाचित्रे पाठवली नाही तरीही त्यांना जतन करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
  • Yahoo ची स्वयंचलित यंत्रणा सर्व संपर्क सामग्रीचे (जसे की, ज्यात तत्काळ संदेश आणि SMS संदेशांसह मेल आणि मेसेंजर मजकूर), कोणत्याही मर्यादेशिवाय, वैयक्तिकरीत्या संबंधित उत्पादन वैशिष्ट्ये आणि सामग्री पुरवणे, उद्दिष्टित जाहिराती जुळवणे आणि सेवा देणे आणि स्पॅम आणि मालवेअरचा छडा लावणे आणि गैरवापरापासून संरक्षण यांसाठी, विश्लेषण करते. हे विश्लेषण सर्व संपर्क सामग्रीवर, यामध्ये आपल्या Yahoo खात्याशी सिंक केलेल्या सेवांमधील संपर्क सामग्रीचा देखील समावेश होतो, ती जसजशी पाठवली जाते, प्राप्त केली जाते तसतसे आणि ज्यावेळी संग्रहित केली जाते त्यावेळी होते. काही वापर बाबींसाठी, अशा दस्तऐवजांचे जनरिक टेम्पलेट तयार करण्यासाठी Yahoo स्वयंचलित अल्गोरिदम्सना कमर्शियल संपर्कांवर रन करतो (उदा. एखाद्या विमानसेवेच्या रिसिटवरील घटक ओळखण्यासाठी प्रचारात असलेल्या भाषेचा उपयोग करणे). या टेम्पलेट्समध्ये प्राप्तकर्त्याच्या वैयक्तिक डेटाचा समावेश होत नाही. Yahoo टेम्पलेट संपादक आमच्या सेवा आणि आपल्या अनुभवाचे आमचे वैयक्तिकरण यांमध्ये सुधारण��� करण्यासाठी या टेम्पलेट्सचे कदाचित पुनरावलोकन करेल.
    • अधिक जाणून घेण्यासाठी कृपया आमचे FAQ वाचा.
    • या माहितीचा उपयोग कदाचित स्वारस्य-आधारित जाहिरातीसाठी केला जाईल. व्यापारी उद्देशाने असलेल्या तसेच आमच्या स्वारस्य-आधारित जाहिरातीमधून आपण आमच्या जाहिरात रुची व्यवस्थापक द्वारे Yahoo च्या स्वयंचलित स्कॅनिंग मधून बाहेर पडू शकता.

माहिती सामायिकरण & प्रकटीकरण कार्य

  • आपण जेव्हा Yahoo मेसेंजरच��� वापर करून संवाद साधता तेव्हा तुमच्या मित्रांसोबत संवाद शेअर करण्याची सुविधा आम्ही आपल्याला देतो.
  • इतर Yahoo मेसेंजर उपयोगकर्त्यांसोबत संवाद साधणे आणि त्यांना शोधणे आपल्याला सोपे जावे यासाठी आम्ही आपल्या संमतीने आपल्या इतर उपकरणावरील डेटासोबत सिंक करू शकतो. आम्ही हे सर्व आपल्याला Yahoo च्या सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आणि आपला ऑनलाइन अनुभव समृद्ध करण्यासाठी जसे की, वैयक्तिकरित्या किंवा समूहामध्ये आपले संपर्क व्यवस्थापित करणे, वारंवार आलेले संपर्क काढून टाकणे किंवा संदेश देण्यासाठी स���पर्क सुचविणे यासाठी मदत करतो.
  • इतर उपयोगकर्ता ज्यांच्या उपकरणावर आपला फोन क्रमांक किंवा ईमेल पत्ता संपर्क म्हणून संग्रहीत असेल, असे उपयोगकर्ता आपल्याला Yahoo मेसेंजर वर शोधू शकतील आणि आपले मेसेंजर नाव आणि छायाचित्र पाहू शकतील.
  • Yahoo मेसेंजर मध्ये सामिल होण्यासाठी आणि 1-पाठोपाठ-1 आणि समूह संभाषण करण्यासाठी आपण आपल्या मित्रांना निमंत्रित करू शकता. आपल्या नाव आणि छायाचित्रासह निमंत्रणामध्ये संदेश सामग्री देखील असू शकते.

इतर

  • “पसंती” सारखी काही वैशिष्ट्ये नवीन Yahoo मेसेंजर मध्ये उपलब्ध आहेत आणि पाठवू नका सारखे फंक्शन जेव्हा आपण Yahoo मेसेंजर समर्थित नसललेले संस्करण वापरत असलेल्या मित्रांसोबत संवाद साधता तेव्हा कार्य करणार नाही. अधिक जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या आंतरप्रक्रिया आणिपाठवू नका मदत पृष्ठे याचे अवलोकन करा.
  • या उत्पादनाविषयी आपल्याला अधिक काही प्रश्न असल्यास कृपया Yahoo मेसेंजर मदत पृष्ठे पाहा.